सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (08:22 IST)

मुंबईकरांना दिलासा! फेब्रुवारी महिन्यात आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईसह राज्यात कोरोनाचा आलेख खालावत चालला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यात रविवारी पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातली ही आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद आहे.त्यामुळे मुंबईकरांना हा दिलासा असून कोरोनामुक्तीकडे वाटचाल आहे.
 
मुंबईतरविवारी 103 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 838 पर्यंत पोहोचली आहे. तर 165 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण 10 लाख 35 हजार 991 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 
विशेष म्हणजे रविवारी  मुंबईत पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. याआधी मुंबईत 15,16,17 , 20 , 23, 25 आणि 26 फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झालेली होती. त्यानंतर आज पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे या महिन्यात आठव्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे.
 
दरम्यान याआधी गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये 7 वेळा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली होती.तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 2 जानेवारीनंतर दि. 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती. तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड’चा पहिला रुग्ण हा ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती.