शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: कल्याण , बुधवार, 15 जून 2022 (15:39 IST)

कल्याणमध्ये तरुणीचा मृत्यू

suicide
कल्याण पूर्वमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीच्या मदतीने सात तरुण संबंधित तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. या त्रासाला कंटाळून या तरुणीने इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपवलं. असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले.