शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (21:28 IST)

लढा ओमायक्रॉन विरुद्ध ,मुंबई महापालिकेचा पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन तयार

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. याबाबत माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत  दिली. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे मुंबई महापालिकेने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. गेल्या दोन दिवसांत 35 हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारी घेतली आहे. 
 
परदेशातून येणाऱ्यांसाठी पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन महापालिकेने तयार केला आहे. धोकादायक देशांमधून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानुसार त्यांना क्वारंटाईन केले जाईल. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी हा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
 
काय आहे अ‍ॅक्शन प्लॅन ?
 
- विमानतळ सीईओकडून हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार.
 
- प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी साँफ्टवेअरची निर्मिती. 

- ही यादी आपात्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डतील वॉररूमला प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार.

-वॉररूममधून प्रवाशांची सतत 7 दिवस संपर्क ठेवण्यात येणार.