बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (13:28 IST)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलांच्या विरोधात एफआयआर दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि नीलेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांच्या तक्रारीवरून भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांच्याविरोधात मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये नीलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे सांगितले होते असा आरोप करण्यात आला आहे.