मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (17:14 IST)

Mumbai : नवी मुंबईतील डेंटल कॉलेज मध्ये दारूपाजून रॅगिंग केली आणि ..

pitai
नवी मुंबईच्या कामोठे डेंटल कॉलेजच्या चार सिनिअर विध्यार्थ्यानी एका ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजात सध्या रॅगिंग करण्याचा प्रकार गुन्हा आहे. या प्रकरणी कॉलेजातील चौघांना  निलंबित करण्यात आले आहे. कॉलेज ने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी चौघांनी या जुनिअर विद्यार्थ्याला आधी दारू पाजली नंतर त्याला पॅण्टमध्ये लघवी करण्यास सांगितले. सदर घटना जुलै मधली असून पीडित विद्यार्थ्याने आपल्या पालकांना या छळाची माहिती आत्ता दिली. ज्युनिअर चा हा विद्यार्थी पहिल्या वर्षात शिकत असून कामोठे येथे आपल्या तीन मित्रांसह राहत होता आणि हे चोघे तिसऱ्या वर्षात शिकणारे वरच्या मजल्याच्या फ्लॅट वर राहत होते. या चोघांनी ज्युनिअर विद्यार्थ्याला आपल्या फ्लॅट मध्ये बोलवून त्याला बळजबरीने दारू पाजली आणि पीडित मुलाला लघवी आल्यावर त्याला पँट मध्येच लघवी करण्यास बाध्य केले.

या मुलाने कॉलेजातील अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकाला तक्रार केल्यावरत्यांनी पोलिसांना त्या चौघांच्या विरोधात तक्रार केली असता त्या चोघांवर मुलाचे छळ आणि रॅगिंग केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कॉलेजने त्या चारही मुलांच्या विरोधात कारवाई करत त्यांना निलंबित केलं आहे.