शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (08:40 IST)

मुंबईतील गणपतींचं फक्त ऑनलाईन दर्शन

मुंबईतील लालबागमधील सर्व गणेमंडळांची मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.या बैठकीमध्ये मुंबईतील गणपतींचं ऑनलाईन दर्शन फक्त देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.म्हणजेच यंदा मुंबईतील गणेशभक्तांना लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहता येणार नाही आहेत,असे वृत्त एका मराठीवृत्तवाहिनीने दिले आहे. 
 
 मुंबईत गणेशोत्सवाच्या दरम्यान सर्वाधिक गर्दी लालबाग येथे असते.लालबागमधील गणपतीच्या मूर्ती या २० ते २२ फूटाचा असतात. पण यंदा कोरोनामुळे गणपतीची मूर्ती ४ फूटांची असणार आहे.तरीही लालबागमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोणत्याही मंडळाच्या गणपतीचे दर्शन बाहेरून येणाऱ्या गणेशभक्तांना घेता येणार नाही आहे.बाहेरून येणाऱ्या गणेशभक्तांसाठी लालबागमधील सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे ऑनलाईन दर्शन ठेवण्यात येणार आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा,रंगारी बदक,चिंचपोकळीचा चिंतामणीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.फक्त मंडळाच्या जवळचे रहिवाशी आणि स्थानिकांचा गणपतीचे ऑफलाईन दर्शन घेता येणार आहे.