शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (08:01 IST)

मुंबईत नंगानाच करणाऱ्या उर्फी जावेद विऱोधआत महिला आयोग का भुमिका घेत नाही

भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी सोशल मीडीया स्टार उर्फी जावेद  विऱोधआत आक्रमक पवित्रा घेत पत्रकार परिषद घेतली. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी महिला आयोगावर निशाणा साधून मुंबईत नंगानाच करणाऱ्या उर्फी जावेद विऱोधआत महिला आयोग का भुमिका घेत नाही ? असा सवाल केला.
पत्रकार परिषदेदरम्यान चित्रा वाघ यांनी उर्फी यांच्या आडून राज्यातील महिला आयोगावर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “सोशल मीडीयावर व्हायरल होणाऱ्या उर्फीच्या अश्लील व्हिडिओंवर कारवाई का झाली नाही? महिला आयोग काय करत आहे? जनतेने उर्फीबरोबरच महिला आयोगालाही प्रश्न विचारण्याची गरज आहे. समाजात खूप घाण असून ती साफ करण्यासाठी कोणाला तरी हात घाण करावाच लागेल.” असे त्या म्हणाल्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor