शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 24 मे 2016 (14:42 IST)

रेल्वे पँट्री कर्मचाऱ्यांची जोडप्याला मारहाण

रेल्वे नीरऐवजी दुसरं पाणी का दिला, असा जाब विचारणाऱ्या जोडप्याला पँट्रीकार कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पँट्रीकार मधल्या 20 कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

प्रदीप गुप्ता आणि त्यांची पत्नीसह कुटुंबातले 12 जण गरिबरथ एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी रेल्वेत मिळणाऱ्या रेल नीर ऐवजी दुसऱ्या कंपनीची पाण्याची बाटली का दिली हे विचारायला गेलेल्या गुप्ता यांच्या पत्नीला पँट्रीकारच्या कर्मचाऱ्यांनी चक्क मारहाण केली. ज्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. हा प्रकार घडत असताना एका सहप्रवाशाने याचं चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केलं.