३८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा केला खात्मा

terrorist
Last Modified बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (23:14 IST)
जम्मू-काश्मीरमध्ये मे २०१८ पासून जून २०२१ दरम्यान कमीत कमी ६३० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. त्यांनी सांगितले की, ‘यादरम्यान ४०० एन्काऊंटर्स झाले असून यामध्ये ८५ जवान शहीद झाले आहेत.’ केंद्रीय गृहराज्य मंत्री मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते.
पुढे नित्यानंद राय म्हणाले की, ‘दहशतवाद्यांबाबत सरकारची जीरो टॉलिरेंस धोरण आहे. सरकारकडून येथे सुरक्षा सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. देशद्रोही घटनांविरोधात कडक कायदे लागू करण्यात आले आहेत. तसेच दहशतवादी संघटनांचा सामना करण्यासाठी सातत्याने शोधमोहिम राबवली जात आहे. दहशतवाद्यांना जे लोकं मदत करत आहेत, त्यांच्यावर सुरक्षा दल बारीक नजर ठेवून आहेत. यासोबत त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.’
जून २०२१ पर्यंत पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार करून जम्मू -काश्मीरमध्ये ६६४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दरम्यान मार्च महिन्यात येथे सीमेपलीकडून गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना घडल्या नाही झाली. द्रमुकचे खासदार तिरुची सिवा यांच्या उत्तरात त्यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘२०१९ मध्ये जम्मू -काश्मीरमध्ये यूएपीए कायद्यांतर्गत १ हजार ९४८ लोकांना अटक करण्यात आली. याशिवाय ३४ जणांना शिक्षा सुनावण्यात आली.’


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

बर्गरमध्ये विंचू, अर्धा भाग चघळल्यानंतर तरुणाची पडली नजर, ...

बर्गरमध्ये विंचू, अर्धा भाग चघळल्यानंतर तरुणाची पडली नजर, घाबरत रुग्णालयात पोहोचला
राजस्थानची राजधानी जयपूरच्या मालवीय नगरमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काल रात्री गोंधळ ...

मोठा अपघात: सैन्यदलाचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मिरात कोसळले ...

मोठा अपघात: सैन्यदलाचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मिरात कोसळले ,दोघे जखमी
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

मोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू

मोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू
अररिया, बिहारमधून मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. येथे एक कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात ...

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद ...

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे सोमवारी संशयास्पद परिस्थितीत निधन झाले ...

गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊला नागपूरने मागे टाकले

गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊला नागपूरने मागे टाकले
नागपुरनं गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊ या शहरांनाही मागे टाकलं आहे. नॅशनल क्राईम ...