शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (19:27 IST)

पोलिसांची कार ट्रकला धडकली, 4 जणांचा जागीच मृत्यू, एक जखमी

मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात तीन पोलिस आणि एक एसयूव्ही ड्रायव्हर जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वर बनमोर औद्योगिक क्षेत्राजवळ पहाटे चारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनधारक उत्तर प्रदेशातील अलीगढ येथून ग्वाल्हेरच्या दिशेने जात होते. 
 
अपघाताचे ठिकाण ग्वाल्हेरपासून 40 किमी अंतरावर
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसयूव्हीमध्ये एक उपनिरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल होते. हे लोक बनमोर औद्योगिक क्षेत्राजवळ पोहोचले होते जेव्हा त्यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिली. बानमोर पोलीस ठाण्याच्या प्रभारींच्या म्हणण्यानुसार, दुर्घटना घडली ती जागा ग्वाल्हेरपासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी आणि वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. 
 
जखमींवर उपचार सुरू आहेत,
बनमोर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलला तत्काळ उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले. जिथे त्याला गजराराजा मेडिकल कॉलेज ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. इतर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.