बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (10:51 IST)

केदारनाथमध्ये अपघात! आकाशातून नदीत कोसळले हेलिकॉप्टर

केदारनाथ खोऱ्यात उड्डाण करणारे MI-17 हेलिकॉप्टर अचानक नदीत कोसळले. काही दिवसांपूर्वी हे हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान बिघडले होते. भारतीय हवाई दल MI-17 हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी घेत होते. त्यानंतर अचानक हेलिकॉप्टर नदीत कोसळले. ही घटना केदारघाटीमध्ये आज म्हणजेच शनिवारी सकाळी घडली आहे. 
24 मे 2024 रोजी MI-17 विमान लँडिंग करत असताना त्यात तांत्रिक बिघाड निदर्शनास आला.

इमर्जन्सी लँडिंगनंतर हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. आज सकाळी क्रिस्टल एव्हिएशन कंपनी एमआय-17 हे दुसऱ्या हेलिकॉप्टरने टोइंग करत होती. हजारो फूट उंचीवर, MI-17 अचानक वेगळे होऊ लागले. धोका टाळण्यासाठी पायलटने खाली रिकामी जागा पाहून हेलिकॉप्टर सोडले. हेलिकॉप्टर दरीत वाहणाऱ्या नदीत पडले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआय-17हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी गौचर हवाई पट्टीवर नेले जात होते. सकाळी सातच्या सुमारास एमआय-17 हे क्रिस्टल एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरला जोडून गौचरच्या दिशेने रवाना झाले. काही अंतर गेल्यावर हेलिकॉप्टरचा तोल सुटू लागला. पायलटने MI-17 थारू कॅम्पजवळ येताच वायर तुटल्याने हेलिकॉप्टर खाली कोसळले.

सुदैवाने या मध्ये एकही प्रवाशी न्हवता.हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाल्यावर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. 
Edited by - Priya Dixit