शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (08:54 IST)

'त्या' भाषणांनंतर संघात सहभागी होणाऱ्याची संख्या वाढली

या महिन्याच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांच्या पश्चिम बंगालमधून संघात सहभागी होण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विप्लव रॉय म्हणाले की, नागपूरमध्ये ७ जून रोजी मुखर्जींच्या भाषणानंतर संघटनेत सहभागी होण्यासाठी लोकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. १ जून ते ६ जून दरम्यान सरासरी आमची वेबसाइट ‘जॉइन आरएसएस’वर राष्ट्रीय स्तरावरून दररोज ३७८ अर्ज प्राप्त होत. सध्या सर्वांत जास्त अर्ज हे पश्चिम बंगालमधून आले आहेत.
 
दि. ७ जून च्या वर्गाला मुखर्जी यांनी संबोधित केल्यानंतर आम्हाला १७७९ अर्ज मिळाले आहेत. ७ जूननंतर आम्हाला दररोज १२००-१३०० अर्ज येत आहेत. यातील ४० टक्के अर्ज हे बंगालमधील आहे. मुखर्जींच्या भाषणानंतर संघाची लोकप्रियता वाढली का, असा सवाल त्यांना विचारला असता  मुखर्जी यांच्यामुळे संघाची स्वीकार्यता मात्र वाढली असल्याचे सांगितले.