रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (10:25 IST)

राजस्थानमध्ये सर्व मंत्र्यांचा राजीनामा

राजस्थानमध्ये उद्या होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत सरकारमधील सर्व मंत्र्यानी राजीनामा दिला आहे.
रविवारी राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट असा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत.
काँग्रेस नेते सचिन पायलट हे आधीच अशोक गहलोत यांच्या कारभारावर नाराज आहेत. गेहलोत हे पायलट समर्थकांना डावलतात अशी त्यांची तक्रार आहे. तसेच राजस्थानमध्ये 2023 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी सचिन पायलट प्रयत्नशील आहेत.
 
गेल्या वर्षी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांनी ही बंडखोरी केली होती. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता.