बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 जानेवारी 2021 (09:02 IST)

भाजप कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करणार

अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार असून पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी  दिली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
पाटील म्हणाले की, अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथील भव्य मंदिरात आपला वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने नागरिकांकडून निधी संकलन करण्यात येणार आहे. भाजपा निधी संकलनासाठी सक्रीय मदत करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मंदिर निर्मितीसाठी दहा दहा रुपये गोळा करतील. त्यासाठी बूथ पातळीपासून सर्वांची योजना पक्षाच्या मुंबईतील बैठकीत निश्चित करण्यात आली.