गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (16:30 IST)

जम्मू: बस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू, 32 लोक जखमी

जम्मूच्या एका बस स्टँडवर गुरुवारी दुपारी जोरदार हल्ला झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार ग्रेनेड अटॅकमध्ये 32 लोक जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. तसेच जखमीतून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्या भागाची घेराबंदी करून चाचणी सुरू केली आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी 10 संदिग्ध लोकांना अटक केली आहे. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान गर्दी असणार्‍या भागात बनलेल्या बस स्टेशनमध्ये एका बसजवळ धमाका करण्यात आला आहे. सांगायचे म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरच जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा कर्मचार्‍यांना अलर्ट वर ठेवले आहेत.  
 
जम्मूचे आयजी मनीष सिन्हा यांनी सांगितले की हा हल्ला ग्रेनेडने करण्यात आला होता. जागेवर उपस्थित लोकांनुसार एका संदिग्ध हल्लाखोरांनी  ग्रेनेडद्वारे हल्ला केला आणि तेथून पळ काढला. 10 संदिग्ध लोकांना अटक करण्यात आली आहे. IG चे म्हणणे आहे की हल्ल्याचे मुख्य कारण  सांप्रदायिक सद्भावेला बिघडवणे होते. या विस्फोटात 17 वर्षाचा मोहम्मद शारिकचा मृत्यू झाला आहे.