1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (11:41 IST)

Britain: खलिस्तान समर्थकांकडून लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान, भारतीय उच्चायुक्तांनी दिले चोख प्रत्युत्तर

रविवारी काही खलिस्तान समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय राष्ट्रध्वज उतरवण्याचा प्रयत्न केला आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने मोठे धाडस दाखवत खलिस्तानींना विरोध करत खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांकडून खलिस्तानी झेंडा फेकून दिला आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर मोठा तिरंगा फडकवला आहे
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर पाहिला जात असून लोक भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारात ही घटना घडली तेव्हा सुरक्षा कर्मचारी तेथून पूर्णपणे गैरहजर होते. याबाबत ब्रिटिश उच्चायुक्तांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. हे व्हिएन्ना कन्व्हेन्शनचेही उल्लंघन असल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारने या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ब्रिटिश उच्चायुक्तांकडे केली आहे.
अमृतपाल सिंग यांच्यावर कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे खलिस्तान समर्थकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्याकडून निदर्शने करण्यात येत आहेत. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील निदर्शने हा देखील या निषेधाचा एक भाग होता. 
 
Edited By- Priya Dixit