मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 जून 2022 (13:52 IST)

लव्ह मॅरेजमुळे संतापलेल्या भावांनी भर बाजारात केली बहिणीची हत्या

murder
आजच्या काळात मुली शिकून प्रगत झाल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात  मुलगा आणि मुलगी एकत्र पणे काम करतात. मुली देखील मुलांच्या बरोबरीने पुढे वाढत आहे. आजच्या काळात त्यांना देखील आपल्या पायावर उभारण्याची संधी दिली जात आहे. मुली पुढे वाढत आहे. जरी हे मुलींसाठी चांगले असले तरी ही समाजात असे काही ठिकाण आहे. जिथे मुलींना मोकळीकदेणं पसंत केले जात नाही. समाजात काही ठिकाणी मुलींच्या प्रेमविवाहाला चांगले मानले जात नाही. प्रेम विवाह केल्यामुळे एका मुलीला आपला जीव गमवावा लागला. तिच्याच भावांनी तिचा भर रस्त्यात तिचा खून केला. 

ही घटना घडली आहे पंजाबच्या तरन -तारन जिल्ह्यातील. येथे एका तरुणीनं आपल्या प्रियकरासोबत 3 महिन्यापूर्वी लग्न केलं.तिचे लग्न तिच्या कुटुंबियांच्या विरोधात झाले होते. त्यांना हे लग्न मान्य नहव्ते. या वर चिडून रागाच्या भरात येऊन तरुणीच्या सख्या आणि चुलत भावाने तिचा भर रस्त्यात बाजारात धारदार शस्त्राने वारकरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्नेहा असे या मयत तरुणीचं नाव आहे. 

मयत स्नेहाचे राजन जोशन या तरुणावर प्रेम होते. त्यांना लग्न करायचे होते पण स्नेहाचे कुटुंबीयांचा या लग्नास विरोध होता. तिने कुटुंबीयांचा विरोध पत्कारुन आपल्या प्रियकराशी 3 महिन्यांपूर्वी कोर्टात लग्न केले. लग्नानंतर ते दोघे सुखात नांदू लागले. बहिणीने प्रेमविवाह केलं या रागावरून तिचा भावाने ती शुक्रवारी बाजारात गेली असता भर रस्त्यात आपल्या चुलत भावासोबत तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
अचानक हल्ला केल्यामुळे बेसावध स्नेहा ला काहीच समजले नाही आणि हल्ल्यानंतर ती रस्त्यावरच तडफडत होती. हल्ल्यानंतर तिचे दोघे भाऊ पसार झाले. ती रस्त्यावरच गंभीररित्या जखमी अवस्थेत पडून होती. तिच्या मदतीला कोणीच आले नाही. नंतर तिला  रुग्णालयात नेण्यात आले असता तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा  सख्ख्या भाऊ रोहित आणि चुलत भाऊ अमरच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहे.