मित्रांनी प्रायव्हेट पार्टमध्ये स्टीलचा ग्लास टाकला
काही वेळा अशा बातम्या येतात जेव्हा एक्स-रे रिपोर्ट्स खूप आश्चर्यकारक असतात. प्रायव्हेट पार्टमधूनही अनेक गोष्टी शरीरात जातात आणि त्यासाठी डॉक्टरांना खूप प्रयत्न करावे लागतात. अशीच एक घटना ओडिशातील ब्रह्मपूरमधून समोर आली आहे जिथे मित्रांनी गंमतीने एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टीलचा ग्लास घातला. त्यानंतर जे घडले ते थक्क करणारे आहे.
ही घटना ओरिसातील गंजाम जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही व्यक्ती गुजरातमधील सूरतमध्ये काम करते. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती काही सहकाऱ्यांसोबत पार्टी करत असताना जवळपास सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. त्याचवेळी त्याच्याच मित्रांनी गंमतीने त्याच्या गुदद्वारातून आतमध्ये स्टीलचा ग्लास टाकला.
त्यादिवशी त्याला नशेमुळे काहीच कळले नाही पण दुसऱ्या दिवशी त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. तो परत त्याच्या खोलीत पोहोचला. यानंतर त्यांना खालच्या आतड्यात वेदना होऊ लागल्या. त्यानंतरही त्यांनी याबाबत कोणालाच सांगितले नाही. वेदना असह्य झाल्यामुळे तो सुरतहून गंजम येथील आपल्या घरी आला आणि घरच्यांना सर्व प्रकार सांगितला.
यानंतर कुटुंबीयांनी त्याला एमकेसीजी रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांच्या टीमने त्याचा एक्स-रे काढला. अहवाल आल्यावर त्याच्या आतड्यात स्टीलचा ग्लास अडकलेला दिसल्याने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर दुर्मिळ शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी आतडे कापून स्टीलचे ग्लास बाहेर काढले. आता त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.