शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

होमवर्क केलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना बांगड्या घालायला लावल्या

गुजरातमधील मेहसाना जिल्यातील खेरुला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी गृहपाठ नसल्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून शिक्षकाकडून हातात बांगड्या घालायला लावण्याची शिक्षा करण्यात आली आहे.  शाळेतील शिक्षक मनुभाई प्रजापती यांनी इयत्ता सहावीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सदरची शिक्षा केली. बांगड्या घालताना या मुलांना गृहपाठ न केल्याबद्दल लाज वाटायला हवी, असा अजब तर्कही या शिक्षकाने आपल्या कृतीमागे दिला आहे.
 
वर्गात शिक्षकांनी दिलेल्या या लाजिरवाण्या शिक्षेमुळे हे तीन विद्यार्थी पुढील दोन दिवस शुक्रवार आणि शनिवारी शाळेत गेले नाहीत. याबाबत मुलांकडे त्यांच्या पालकांनी विचारणा केल्यानंतर प्रकार उघड झाला. आता  शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.