शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जानेवारी 2019 (09:34 IST)

हार्दिक अडकणार बाल मैत्रिणीसोबत अडकणार विवाहबंधनात

गुजरातमधील येथील सध्या तरुण आणि तडफदार असा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या बालमैत्रिणीशी २७ जानेवारी रोजी लग्न करणार आहे. हार्दिक हा  बालमैत्रीण किंजल परिख हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरात येथील सुरेंद्रनगर तालुक्यातील दिगसर गावात जवळच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होईल अशी माहिती पुढे येते आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकचे वडील भारत यांनी सांगितले की, हार्दिक व किंजल बालपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघेही अहमदाबाद येथील विरामगम तालुक्यातील चंदननगरी गावातील रहिवासी आहेत. हार्दिक आणि किंजल यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबियांनी मान्यता  दिली आहे. २७ जानेवारीला हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे भारत पटेल यांनी सांगितले. किंजल पाटीदार समाजातील नसल्याचे वाटू शकते. परंतु, ती पाटीदार समाजातीलच आहे म्हणून हा आंतरजातीय विवाह नसल्याचेही भारत पटेल यांनी स्पष्ट केलेय. किंजल परिख मूळची सूरतची आहे. गांधीनगर येथून वकिलीचे शिक्षण घेते आहे.