शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ISI अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केली आहे. मन्मथ म्हैसकर (२२) असे मुलाचे नाव आहे. मलबार हिलमधील इमारतीवरुन उडी मारुन मन्मथने आत्महत्या केली. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत तर,  मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.  
 
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्राला भेटायचं असल्याचं सांगून घराबाहेर पडला होता. साडे सात वाजण्याच्या सुमारास मन्मथने मलबार हिलमधील दरिया महल इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र मन्मथचा जागीच मृत्यू झाला होता. मलबार हिल पोलिसांनी पोस्टमॉर्टमकरिता मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मलबार हिल पोलिसांनी चौकशीसाठी दोन मित्रांना ताब्यात घेतलं आहे.