शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सीए परीक्षेत ईती अग्रवाल पहिली

द चार्टर्ड अकौन्टन्ट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेच्या वतीने घेण्यात डिसेंबर २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (सीपीटी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.यामध्ये  देशात ईती अग्रवाल पहिली, भिवंडीचा पियूष लोहिया दुसरा तर अहमदाबादची ज्योती महेश्वरी देशातून तिसरी आली आहे. 
 
देशातील १७१ शहरांमध्ये दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. गेल्यावर्षी २.२८ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. तर डिसेंबर २०१६ मध्ये सनदी लेखापालपदासाठीची (सीए) अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी  ICAI, icai.nic.in संकेतस्थळावर क्लिक करा. संकेतस्थळाच्या होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला सीए आणि सीपीटी निकाल असे दोन विभाग दिसतील. यापैकी एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक अथवा तुमच्या रोल नंबरसोबत दिलेला पिनक्रमांक विचारण्यात येईल. त्यानंतर सबमिट किंवा एंटर बटण क्लिक केल्यास तुम्हाला निकाल पाहता येईल.