बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जानेवारी 2019 (09:10 IST)

लोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी

लोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटकांना मारहाण केल्याचे समजते. येथील टायगर पॉईंटच्या परिसरात हा प्रकार घडला. हे पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी याठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबतची मुले घोड्यावर बसली होती. मात्र, टायगर पॉईंटजवळ आल्यानंतर घोड्याच्या मालकाने ठरलेल्या सौद्यापेक्षा जास्त पैसे मागितले. यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरु झाली. हा प्रकार सुरु असताना याठिकाणी व्यवसाय करणारे अन्य काहीजणही भांडणात सामील झाले. या सगळ्यांनी मिळून पर्यटकांना बेदम मारहाण केली. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे