बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (09:42 IST)

मुंबई - दिल्ली रेल्वेला गुर्जर आंदोलाचा फटका वाहतूक विस्कळीत

राजस्थानमध्ये गुर्जर समाजाने पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी जोरदार आंदोलन सुरु केले आहे. संतप्त नागरिकांनी मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर ताबा घेत पूर्ण वाहतूक बंद पाडली आहे. सोबतच तसेच जयपूरसह अन्य शहरांमध्ये रस्ते बंद केल्याने मोठी वाहतूक कोंडी केली आहे. आम्हाला आरक्षण मिळत नाही तोवर रेल्वे, रस्ते वाहतूक बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला. यावर राजस्थान सरकारने पोलिस दल तैनात केले आहे. सोबतच या बह्गातील इंटरनेट सेवाही ठप्प केलीय. आंदोलनामुळे पश्चिम मध्य रेल्वेने 4 ट्रेन रद्द केल्या असून 7 ट्रेन अन्य मार्गे वळविल्या आहेत. त्यामुळे रेल्वेवेचे मोठे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. रेल्वेमार्गावर रेल्वे खात्याने रेल्वे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले असून, सवाई माधवपूर जिल्ह्यातील मलारना डुंगर भागात शुक्रवारी गुर्जर समाजाने महापंचायत बोलावली होती. आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक कर्नल किरोडी सिंह बैसला यांनी गुर्जर समाजासह रायका, बंजारा, गाडि़या लोहार, रेवारी समाजाला पाच टक्के आरक्षण देण्य़ाची मागणी केली. यासाठी त्यांनी सरकारला 20 दिवसांची वेळ दिली होती. यामुळे आता सरकारने त्यांच्या सोबत बोलणी केली नाही तर मोठे संकट उभे राहील अशी भीती आहे.