1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सिंगरौली , शुक्रवार, 3 मार्च 2023 (14:40 IST)

पाचव्या बायकोकडून पतीची हत्या

murder
सिंगरौली जिल्ह्यातील उरती गावात एका व्यक्तीच्या हत्येचे प्रकरण पोलिसांनी उघड केले. पत्नीनेच पतीची हत्या केली होती. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. गावातील बिरेंद्र गुर्जर यांचा मृतदेह 21फेब्रुवारी रोजी सापडला होता. मृताच्या गळ्यावर व गुप्तांगावर जखमेच्या खुणा होत्या.
 
 कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण पांडे यांनी सांगितले की, मृताची पत्नी कांचन गुर्जर हिने पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून पोलीस या हत्येचा उलगडा करण्यात गुंतले होते. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या अनेक जवळच्या नातेवाईकांसह संशयित प्रत्येकाची चौकशी करून कसून तपास केला.
 
यादरम्यान मृताची पत्नीही पोलिसांच्या तावडीत आली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली असता, हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.मृत बिरेंद्र गुर्जरची पत्नी कांचन हिने हत्येचा खुलासा करत पती नशेचे व्यसन असल्याचे पोलिसांना सांगितले. दारूच्या नशेत तो तिच्यावर खूप अत्याचार करायचा. 
 
वैतागलेल्या कांचनने पतीच्या हत्येचा कट रचला आणि 21 फेब्रुवारीच्या रात्री पती बिरेंद्रच्या जेवणात झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्या. पती गाढ झोपेत असताना ही भीषण घटना घडली.
 
 चौकशीत महिलेने आधी पतीवर कुऱ्हाडीने अनेक वार केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तिने पतीच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करून खून केला.
 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन गुर्जर या मृत बिरेंद्र गुर्जर यांच्या पाचव्या पत्नी होत्या. यापूर्वी बिरेंद्रच्या छळामुळे चार बायका त्याला सोडून गेल्या होत्या. या छळाला कंटाळून कांचनने पतीचीही हत्या केली.
Edited by : Smita Joshi