गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊला नागपूरने मागे टाकले

crime
Last Modified सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (22:16 IST)
नागपुरनं गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊ या शहरांनाही मागे टाकलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नव्या अहवालात हे दिसून आलं आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या गुन्ह्यात नागपूरने देशात पहिला क्रमांक आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर गेल्या काही वर्षांमध्ये गंभीर गुन्ह्यांमुळं सतत चर्चेत
आहे. 2014 ते 2020 पर्यंत पासून राज्याचं गृहमंत्री नागपुरचे होते. मात्र शहरात
गुन्हेगारीला लगाम मात्र लागला नाही. नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरोच्या नव्या अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात नागपूर देशात टॉपवर आहे.

नागपुरात 2020 मध्ये हत्येच्या 97 घटना घडल्या. नागपूर पेक्षा जास्त हत्या झालेल्या शहरांमध्ये दिल्ली, बंगळूरु, चेन्नई, मुंबई, सुरत शहरांचा समावेश आहे. मात्र, नागपूरच्या तुलनेत या सर्व शहरांची लोकसंख्या जास्त आहे. काही शहरांत तर ती दुप्पट किंवा तिप्पट आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2020 वर्षाच्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणाचे दर 3.9 इतका असून हा देशात सर्वाधिक आहे.

या अहवालानुसार 2020 मध्ये बिहारची राजधानी पाटणा मध्ये हत्येची 79 प्रकरणं नोंदवली गेली असून दर एक लाख लोकसंख्या प्रमाणे पाटण्यात हत्येचा दर 3.84 आहे. म्हणजे नागपुरनं हत्येच्या घटनांमध्ये पाटण्यालाही मागे टाकले आहे. गेल्यावर्षी यासंदर्भात नागपूरचं स्थान पाटण्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर होतं.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

मुलाच्या हव्यासापोटी आईने एका दिवसाच्या मुलीला उशीनं दाबून ...

मुलाच्या हव्यासापोटी आईने एका दिवसाच्या मुलीला उशीनं दाबून मारुन टाकलं, तर एका बापाने 16 दिवसांच्या मुलीला शेतात पुरलं
मुली त्यांच्या प्रतिभा आणि कर्तृत्वामुळे गगनाला स्पर्श करत आहेत, पण तरीही समाजात अशा ...

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम ...

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारले, विद्यार्थ्याचा मृत्यू
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका शिक्षकाने विद्यार्थ्याला इतकी निर्घृण मारहाण केली की ...

ट्रेकिंगला गेलेल्या 8 पर्यटकांसह 11 जण बेपत्ता

ट्रेकिंगला गेलेल्या 8 पर्यटकांसह 11 जण बेपत्ता
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील चितकुलमध्ये 8 पर्यटकांसह अकरा जण बेपत्ता झाले आहेत. ...

केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवणं नाही तर मनातून ...

केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवणं नाही तर मनातून भीती दूर करणं - नरेंद्र मोदी
"केंद्रीय तपास संस्थांचं काम कुणाला घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं हे ...

परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह ...

परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागेल, सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
कोरोना महामारीचा उद्रेक अजून संपलेला नाही. दरम्यान, भारत सरकारने परदेशातून येणाऱ्या ...