शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:59 IST)

Karnataka hijab controversy : प्रियंका गांधी म्हणाल्या बिकिनी किंवा हिजाब घालणे ही महिलांची च्वाइस आहे

Priyanka Gandhi
कर्नाटकातील हिजाब वादात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही उडी घेतली आहे. महिलांनी बिकिनी घालावी की हिजाब, ही त्यांची निवड आहे, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. याप्रकरणी कोणाला बोलण्याचा अधिकार नाही.प्रियांका गांधी यांनी ट्विट करून लिहिले आहे की, बिकिनी घाला, बुरखा घाला, जीन्स घाला की हिजाब, काय घालायचे हा महिलांचा अधिकार आहे. आणि हा अधिकार त्यांना भारतीय राज्यघटनेतून मिळाला आहे. भारतीय राज्यघटना त्याला काहीही परिधान करण्याची हमी देते. त्यामुळे महिलांचा छळ करणे थांबवा.