बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 19 डिसेंबर 2020 (16:04 IST)

सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांचा एनएसईएलचा २५० कोटी रुपयांचा घोटाळा यापूर्वी बाहेर आला होता. त्या पैशांतून त्यांनी कल्याण तालुक्यातील गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत. त्यांवर ईडीची जप्ती आली असताना हे व्यवहार पुढे सुरूच आहेत, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांना एक खुलं आव्हान दिलं आहे.
 
"प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच" असं म्हणत सोमय्यांनी आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "शिवसेना प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील" असं म्हटलं आहे. तसेच "एक रुपयांचाही दावा ते माझ्याविरोधात दाखल करू शकत नाहीत. सरनाईक यांनी आधी जनतेच्या फसवणुकीचा जाब द्यावा" असं देखील याआधी म्हटलं आहे.