गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (16:51 IST)

ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, 6 जणांचा होरपळून मृत्यू

भरुच : गुजरातमधील भरुचमध्ये मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट एका ऑरगॅनिक कंपनीत झाला असून त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
 
भरूचच्या हुंडा येथील ओम ऑरगॅनिक कंपनीत रविवारी उशिरा हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट एवढा जोरदार होता की कंपनीत काम करणाऱ्या 6 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटाचा आवाजही दूरवर ऐकू आला. त्याचवेळी भरूचच्या ऑरगॅनिक कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
 
6 जणांचा मृत्यू झाला
भरुचच्या एसपी लीना पाटील यांनी सांगितले की, जेव्हा प्लांटचा स्फोट झाला तेव्हा रिअॅक्टरजवळ 6 लोक काम करत होते. डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली, त्यात 6 जणांचा जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. कारखान्यातील आग विझवण्यात आली आहे.