बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

10 वर्षीय बलात्कार पीडितेने दिला बाळाला जन्म

चंदीगड- मामाने बलात्कार केल्यानंतर गर्भवती राहिलेल्या 10 वर्षीय चिमुरडीने एका बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी सिजेरियन करुन मुलीची प्रसूती केली. बाळाचे वजन खूपच कमी असल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. चंदीगडमधील सेक्टर 32 येथील सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि पीजीआयच्या डॉक्टरांच्या एका पॅनलच्या निर्णयानंतर या मुलीची प्रसूती करण्यात आली.
 
मुलीची प्रसूती आधी कण्यात येणार होती परंतू तिचा बीपी सामान्य नसल्याने ती पुढे ढकलण्यात आली होती. मामाने बलात्कार केल्यानंतर भाची गर्भवती राहिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. पीडित मुलीच्या आई वडिलांना मुलीचा गर्भपात करायचा होता परंतू मुलगी गर्भवती होऊन 32 आठवड्यांचा कालावधी झाल्याने तो करता आला नाही.