रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (20:02 IST)

गोव्यात खुल्यावर मद्यपान केल्यास २ हजारांचा दंड

गोव्यात उघड्यावर मद्यपान करण्यासाठी परवानगी असल्यामुळे अनेक तळीराम खुल्यावरच मद्यपान करताना दिसतात. कलंगुट, बागा आणि मॉरजिम या किनाऱ्यावर शांतपणे बसून खुल्यावर मद्यपान करताना अनेक तळीराम आढळतात. इतर राज्याच्या तुलनेत गोव्यात मद्य स्वस्त असल्यामुळे अनेक पर्यटकही खुल्यावर मद्यसेवन करताना दिसतात. मात्र यापुढे गोव्यात खुल्यावर मद्यपान केल्यास २ हजारांचा दंड आकारला जाणार आहे. हा कायदा नुकताच गोव्यात विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यानंतर पर्यटकांना किंवा इतर नागरिकांना खुल्यावर  मद्यपान करता येणार नाही. गोवा पर्यटन सरंक्षण व देखरेख कायदा २००१ मध्ये मागील आठवड्यात ही सुधारणा केली आहे.