शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 20 जानेवारी 2012 (10:45 IST)

अपघातग्रस्त जहाजावरील 12 भारतीय परतले

इटलीतील समुद्र किनार्‍यावरील अपघातग्रस्त जहाजावरील 12 भारतीय प्रवासी मायदेशी परतले. नशीब बलवत्तर म्हणून आम्ही या घटनेतू सहिसलामत बाहेर पडलो. हा आमच्यासाठी थरारक अनुभव होता, अशी प्रतिक्रिया या प्रवाशांनी दिली.

दोनशेपैकी 12 प्रवासी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यातील सहा जण गोवा आणि दोन जण स्थानिक विमानाने अनुक्रमे लखनौ आणि गुवाहाटीकडे रवाना झाले, अशी माहिती सरकारी अधिकार्‍यानी दिली. उर्वरित 125 प्रवासी आज परतणार आहेत, असेही ते म्हणाले.

इटलीमध्ये गिगलिओजवळ 14 जानेवारी रोजी रात्री चार हजार प्रवासी वाहून नणार क्रूझ जहाज समुद्रात बुडाले होते. जहाज 20 अंशाच्या कोनात उलटले होते. त्यातील अनेक प्रवाशांना लाईफ बोटींच्या मदतीने वाचविण्यात आले होते, तर काही पोहून किनार्‍यावर आले होते. जहाजात इटली, जर्मनी, फ्रान्समधील 3200 प्रवासी व जहाजाचे कर्मचारी होते.