शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2015 (09:28 IST)

कोळसा घोटाळा: मनमोहनसिंग याच्याविरुद्ध पुरावा नाही

नवी दिल्ली- कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग याच्याविरुद्ध सकृतदर्शनीदेखील कोणताही पुरावा नसल्याचे प्रतिपादन सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात केले. याप्रकरणी सीबीआय न्यायाधीश भारत पराशर 16 ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहेत.
 
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी मनमोहनसिंग यांच्यासह तिघांना कोळसा घोटाळ्याप्रकरणी सहआरोपी करावे आणि समन्स पाठवावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. सरकारी वकील आर. एस. चिमा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सांगितले की, सीबीआयने कोळसा घोटाळा प्रकरणी चौकशी पूर्ण केलेली असून त्यांना कोठेही माजी पंतप्रधानाविरुद्ध पुरावे सापडलेले नाहीत. कोडा यांनी उल्लेख केलेल्या इतर दोघा व्यक्तींबाबत चिमा यांनी म्हटले की, या दोन्ही व्यक्ती फिर्यादी पक्षाच्या प्रमुख साक्षीदार आहेत.