शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

खासदारकीनंतर संन्यास?

WD
राष्ट्पतींच्या कोट्यातून सचिनसह ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आग यांच्या नावांची काँग्रेसने राज्यसभेसाठी शिफारस केली. राष्ट्रपतींच्या कोट्यातील पाच जागांपैकी दोन जागा अद्यापही रक्ति आहेत. त्यापैकी एकावर एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुखाची तर दुसरी एका वैज्ञानिकाला बहाल करण्याचे काँग्रेस गोटात प्रयत्न सुरू आहेत.

राज्यसभेवर नियुक्त होणारा सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिडापटू आहे. अपवाद फक्त कुस्तीपटू व अभिनेता दारासिंग यांचा. गेले 22 वर्षे सचिन क्रिकेट मैदान गाजवतो आहे. अनेकदा त्याने निवृत्त व्हावे अशी ओरडही झाली. शतकांचे महाशतक पूर्ण केल्यावर ‍सचिनने आपला निवृत्तीचा अजिबात विचार नाही, असे ठामपणे सांगितले.

सचिनचा हा ठामपणाच बीसीसीआयच्या नजरेत खुपल्याचे मानले जाते. ‍सचिनला राज्यसभेवर पाठवण्याचे श्रेय काँग्रेसकडे जात असले तरी या प्रकरणाचा मास्टरमाईंड बीसीसीआयचे आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी सचिनच्या खासदारकीसाठी प्रयत्न केले. अर्थात सचिनने क्रिकेटला रामराम ठोकावे आणि सक्रीय राजकारणात सहभागी व्हावे, असा शुक्लांचा हेतू असल्याचे सांगण्त येते. सचिनचे रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याशी असलेले नाते आणि अंबानी यांचा थेट पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दरबारात असलेला दबदबा पाहता शुक्ला-अंबानी आणि केंद्र सरकारचे हे त्रिकुय सचिनच्या खासदारकीसाठी जमून असल्याचे चित्र उभे केले जात आहे.

विशेष म्हणजे, सचिनच्या खासदारकीसाठी थेट सोनिया गांधी यांनीही रस दाखवला. सचिनला सपत्नीक आपल्या निवासस्थानी बोलावून राज्यसभेची ऑफर स्वीकारण्याची गळ घातली. सचिनच्या खासदारकीमागे अशा तर्‍हेने राजकीय फिल्डींग लागल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.