शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 8 जुलै 2014 (10:48 IST)

गंगा शुद्धीकरणावर उमा भारती यांची घोषणा

गंगोत्री ते गंगासागरपर्यंतच्या गंगा नदीप्रवाहातील अडथळे दूर करत प्रदूषणमुक्त गंगेचे स्वप्न गंगा पुनरुज्जीवन प्रकल्पातून आखण्यात आले आहे. असे आश्वासन केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांनी दिले. तसेच या कामात सरकार बांधील असून निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, त्या गंगा मंथन कार्यक्रमात संबोधित करत होत्या.

उमा भारती म्हणाल्या, प्रकल्पाशी संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधुनिक भगीरथ संबोधत त्यांच्या प्रयत्नांमुळेच गंगा नदीचा अंतर्भाव जलसंपदा विभागात करण्यात आला.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये गंगा शुद्धीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. नरेंद्र मोदी यांनी दोन्ही हात उंचावून भरभरून पाठिंबा दिला. गंगेच्या विषयात मोदी यांना किती आत्मीयता आहे हे माझ्या लक्षात आले. गंगा नदी राष्ट्रीय शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत एका दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देश-विदेशातील मान्यवर सहभागी झाले होते.