शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 6 मार्च 2012 (17:25 IST)

पंजाबमध्ये शिरोमणीचा सत्ता राखत इतिहास

पंजाबमध्ये सत्ताधारी शिरोमणी अकाली दल-भाजपा आघाडी सरकारने सत्ता राखत इतिहास रचला आहे. गेल्या 46 वर्षाच्या इतिहासात सत्ताधारी पक्ष येथे सलग दुसर्‍यांदा सत्तेत आला नव्हता.

मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या नेतृत्वात सत्ताधारी आघाडीने 68 जागा जिंकल्या तर कॉंग्रेसला 46 जागांवर समाधान मानावे लागले. राज्यातील कॉंग्रेसचे नेते अमरिंदरसिंह यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे.

कॉंग्रेससाठी हा पराभव अनपेक्षित आहे, कारण पक्षात मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत स्पर्धेस सुरूवातही झाली होती. पंजाबात कॉंग्रेस सत्तेत येईल, याचा पक्षास विश्वास होता.