शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (16:07 IST)

पाकच्या फायरिंगमध्ये दोन भारतीय महिलांचा मृत्यू

पाकिस्तानचा खोडसाळपणा कमी झालेला नाही. पाक सैन्याने जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी बुधवारी पहाटे केलेल्या गोळीबारात दोन भारतीय महिलांचा मृत्यु झाला आहे. पाकिस्तानकडून फायरिंग सुरू असून भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले आहे. 
 
पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात सांबा गावच्या दोन महिलांचा मृत्यू झाला असून 19 नागरिक जखमी आहेत. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या 37 बॉर्डर पोस्टवर हल्ला चढवीला आहे. त्यात 15 पाकिस्तानी नागरिक ठार झाले आहेत. तर 30 हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 
भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी रेंजर्सच्या चौक्यांचेही नुकसान झाले आहे. पाकिस्तानकडून सांबा, कठुआ, अरनिया, आरएसपुरा सेक्टरमध्येही फायरिंग केले जात आहे.
 
पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी गृहमंत्रालयाने एक तातडीची बैठक बोलावली आहे. यात गृहसचिव, आयबी प्रमुख आणि बीएसएफचे प्रतिनिधीही बैठकीस उपस्थित राहणार आहेत.