शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: गुरुदासपूर , शुक्रवार, 27 जानेवारी 2012 (17:12 IST)

प्रकाश सिंग बादल सर्वोत्तम मुख्यमंत्री - लालकृष्ण अडवाणी

मुंख्यमंत्री प्रकाश सिंग बादल हे पंजाबचे आतापर्यंतचे सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचे प्रमाणपत्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ट अडवाणी यांनी दिले. त्यांच्या कार्यकाळात पंजाबने विकासाचे नवे उच्चांक प्रस्थापित केले, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या मुद्यावरून केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. अडवाणी भाजनच्या येथील उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित एका जाहीर सभेत बोलत होते.