शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पाटणा , सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (11:35 IST)

बिहार निवडणुकीत मतदान सुरु

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यातील ४९ मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिला तासाभरात ६ टक्के मतदान झाले आहे.
 
बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, बांका, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नवादा आणि जमूई अशा १० जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजेपर्यंत खगडिया आणि बांका येथे ७ ते ८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.