शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

भारतीयांच्या ह्रदयावरही ओबामांचे राज्य

वेबदुनिया सर्वेक्षण २००८ चा निकाल जाहीर

NDND
अमेरिकेतील पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा भारतीयांच्या ह्रदयावरही विराजमान आहेत. देशातील सर्वांत लोकप्रिय व्यक्तीमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे पहिल्या स्थानावर आहेत. भारतातील पहिले बहुभाषक पोर्टल वेबदुनिया.कॉमने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे.

वेबदुनियाचे अध्यक्ष व मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) श्री. पंकज जैन यांनी सांगितले, की राजकारण, चित्रपट, खेळ, अर्थजगत यासह एकूण दहा विभागात हे सर्वेक्षण घेण्यात आले. देशातील आणि जगातील अनेक नामांकीत व्यक्तींचा त्यात समावेश केला होता. हे सर्वेक्षण हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांत घेतले गेले. सर्वेक्षणात सोनिया गांधी सर्वांत लोकप्रिय महिला म्हणून पुढे आल्या आहेत. एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण आडवाणी हे सर्वांत लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्व ठरले आहे.

बॉलीवूडमध्ये कैटरीना कैफचे सौंदर्य प्रभावी ठरले आहे. तर अक्षय कुमार बॉलीवूडचा नवा बादशहा ठरला आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी लोकप्रियतेतही अव्वल आहे, तर इतर खेळात विश्वनाथन आनंदने बाजी मारली आहे.

चर्चेतील व्यक्ती ओबामा: जगभरात सर्वाधिक चर्चेतील व्यक्ती अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा (57.88%) ठरले. त्यांच्या जवळपासही कुणी फिरकू शकले नाही. 10.76 टक्के मते घेऊन बिल गेट्स दुसर्‍या स्थानवर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 9.33 टक्के मते घेऊन तिसर्‍या स्थानावर आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना केवळ 1.22 टक्के लोकांची मते मिळाली आहे. पतंप्रधान मनमोहनसिंग यांनाही 2.50 टक्के मते मिळाली आहेत.

NDND
कलामांची कमाल : भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्‍ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भारतात विलक्षण लोकप्रिय असल्याची खात्री या सर्वेक्षणात पटली आहे. सध्या कोणत्याही मोठ्या पदावर नसतानाही त्यांना सर्वाधिक 36.72 टक्के मते मिळाली. उद्योगपती मुकेश अंबानी 17.63 टक्के मते घेऊन दुसर्‍या स्थानावर आहेत. क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी (14.62%) आणि उद्योगपती रतन टाटा (13.46%) अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या स्थानावर आहेत.

NDND
राजकारणात अडवानी: एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण आडवाणी सर्वांत लोकप्रिय राजकीय नेता ठरले आहेत. अडवानी यांना 29.01 टक्के मते मिळाली आहेत. मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांनी अनुक्रमे 21.27 व 16.76 टक्के मते मिळवून अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले आहे. राहुल गांधींना 6.51 टक्के मते मिळाली आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना केवळ 3.08 टक्के मते मिळाली आहेत.
NDND
सोनिया गांधी लोकप्रिय महिला : कुशल नेतृत्व आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या कलेमुळे कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी सर्वांत लोकप्रिय महिला ठरल्या आहेत. त्यांना 30.41 टक्के मते मिळाली. दुसरे स्थान आश्चर्यकारकरित्या एमडीएमके नेत्या जयललिता (16.54) यांना मिळाले आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना 15.34 टक्के मते मिळाली आहे. किरण बेदी यांना 14.39 टक्के मते मिळाली आहेत.

IFMIFM
अक्षय कुमार बॉलीवूडचा बादशहाः बॉलीवूडमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. शाहरूख आतापर्यंत बॉलीवूडचा बादशहा होता. पण आता ते स्थान अक्षयकुमारने खेचून घेतले आहे. त्याला 22.03 टक्के मते मिळाली आहे. शाहरुख खान त्याच्यापेक्षा 4.5 टक्के मतांनी मागे आहे. त्याला 18.14 मते मिळाली. ऋतिकची लोकप्रियता आमिर खानपेक्षा जास्त आहे. अक्षयच्या 'सिंग इज किंग' चित्रपटास 24.70 टक्के मते मिळाली. तामिळ ‍चित्रपट 'दशावतारम' आणि जाने तू अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर आहे.

IFMIFM
कतरीना लोकप्रिय अभिनेत्री : बूमसारख्या फालतू चित्रपटातून ‍कारकिर्द सुरू करणार्‍या कतरीना कैफने ऐश्वर्या रॉयला धक्का देत बॉलीवूड क्वीनचा किताब पटकावला आहे. तिला 32.63 टक्के मते मिळाली. दुसरे आणि तिसरे स्थान अनुक्रमे प्रियंका चोप्रा (12.74%) आणि करीना कपूर (11.97%) यांना मिळाले आहे. सर्वांत सेक्सी अभिनेत्री म्हणूनही कतरीना 23.60 टक्के मते मिळवून पुढे आहे. हॉट मल्लिका शेरावत (22.55%) टक्के मते घेऊन दुसर्‍या स्थानावर आहे. तिसर्‍या स्थानावर शिल्पा शेट्‍टी (19.69%) आहे.

NDND
धोनी लोकप्रियः टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी लोकप्रिय क्रिकेट खेळाडूंत सर्वांत पुढे आहे. 44.90 टक्के मते त्याला मिळाली आहेत. युवराजसिंह (19.28) टक्के मते घेऊन दुसर्‍या स्थानावर आहे. सेहवाग आणि गांगुली तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

NDND
आनंदी आनंद गडे : बुद्धिबळाच्या चौसष्ठ घरांचा राजा विश्वनाथन आनंद 51.44 टक्के मते घेऊन इतर खेळाडूंत सर्वांत पुढे आहे. अभिनव बिंद्रा (25.39%) दुसर्‍या तर बॉक्सर विजेन्दर कुमार तिसर्‍या स्थानावर आहे. सायना नेहवाल चौथ्या स्थानावर आहे.


वेबदुनिया सर्वेक्षण-२००८ चा विस्तृत निकाल :

1. जगातील सर्वांत चर्चेतील व्यक्ती : बराक ओबामा 57.88%, बिल गेट्‍स 10.76%, सचिन तेंडुलकर 9.33%, डॉ. कलाम 9.23%, लक्ष्मी मित्तल 5.20%, मनमोहनसिंह 2.50%, इंदिरा नुई 1.84%, वॉरेन बफेट 1.53%, परवेझ मुशर्रफ 1.22%, कार्ला ब्रूनी 0.51%।

2. देशातील सर्वांत लोकप्रिय व्यक्ती : डॉ. कलाम 36.72%, मुकेश अंबानी 17.63%, महेंद्रसिंह धोनी 14.62%, रतन टाटा 13.46%, बाबा रामदेव 7.03%, लता मंगेशकर 4.77%, सोमनाथ चटर्जी 1.96%, अरविंद अडीगा 1.56%, विजय माल्या 1.31%, श्रीश्री रविशंकर 0.95%।

3. देशातील सर्वांत लोकप्रिय राजकीय नेता : लालकृष्ण अडवानी 29.01%, डॉ. मनमोहनसिंह 21.27%, सोनिया गांधी 16.76%, लालू यादव 11.48%, राहुल गांधी 6.51%, पी. चिदंबरम, 4.92% एम. करुणानिधि 4.20%, मायावती 3.08%, राज ठाकरे 2.10%, प्रकाश करात 0.67%।

4. देशातील सर्वांत लोकप्रिय महिला : सोनिया गांधी 30.41%, जयललिता 16.54%, प्रतिभा पाटिल 15.34%, किरण बेदी 14.39%, सानिया मिर्झा 8.61%, मायावती 5.51%, शीला दीक्षित 4.20%, वसुंधरा राजे 3.05%, उमा भारती 1.31%, ममता बनर्जी 0.63%।

5. देशातील सर्वांत लोकप्रिय अभिनेता : अक्षय कुमार 22.03%, शाहरुख खान 18.14%, रजनीकांत (दक्षिण भारत) 13.74%, ऋतिक रोशन 14.96%, कमल हासन (दक्षिण भारत) 11.32%, आमिर खान 8.69%, अभिषेक बच्चन 5.41%, सलमान खान 2.37%, चिरंजीवी (दक्षिण भारत) 1.92%, संजय दत्त 1.41%।

6. देशातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री : कैटरीना कैफ 32.63%, प्रियंका चोप्रा 12.74%, करीना कपूर 11.97%, दीपिका पादुकोण 11.25%, जेनेलिया डिसूजा 8.98%, रानी मुखर्जी 8.42%, श्रेया (दक्षिण भारत) 3.21%, अनुष्का (दक्षिण भारत) 1.00%, संजना गांधी (दक्षिण भारत) 3.05%, असीन (गजिनी फेम) 6.76%।

7. सर्वोत्कृष्ट चित्रपट : सिंह इज किंग 24.70%, दशावतारम (दक्षिण) 17.64%, जाने तू..या जाने ना 13.54%, ए वेडनसडे 12.08%, रब ने बना दी जोड़ी 10.90%, जोधा अकबर 7.98%, गजिनी 4.75%, रॉक ऑन 3.29%, सरकार राज 3.07%, फैशन 2.05%।

8. सर्वांत सेक्सी अभिनेत्री : कतरीना कैफ 23.60%, मल्लिका शेरावत 22.55%, शिल्पा शेट्‍टी 19.69%, करीना कपूर 10.73%, नमिता (दक्षिण भारत) 8.14%, नयनतारा (दक्षिण भारत) 6.93%, नेहा धूपिया 3.36%, राखी सावंत 2.59%, सेलिना जेटली 2.15%, अभिनयश्री (दक्षिण भारत) 0.28%।

9. देशातील सर्वांत लोकप्रिय क्रिकेटपटू : महेंद्रसिंह धोनी 44.90%, युवराजसिंह 19.28%, वीरेंद्र सेहवाग 12.58%, सौरव गांगुली 8.56%, गौतम गंभीर 3.92%, झहीर खान 3.30%, अनिल कुंबले 2.73%, हरभजनसिंह 1.96%, इरफान पठान 1.49%, सुरेश रैना 1.29%।

10. देशातील सर्वांत लोकप्रिय खेळाडू : विश्वनाथन आनंद (बुद्धिबळ) 51.44%, अभिनव बिंद्रा (नेमबाजी) 25.39%, विजेंद्र कुमार (बॉक्सिंग) 6.94%, सायना नेहवाल (बॅडमिंटन) 5.02%, सुशील कुमार (कुस्ती) 3.60%, लिएंडर पेस (टेनिस) 2.99%, बायग भुतिया (फुटबॉल) 1.82%, एमसी मेरीकॉम (महिला बॉक्सर) 1.12%, जीव मिल्खासिंह (गोल्फर) 0.81%, मिताली राज (क्रिकेट) 0.86%।