शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 22 एप्रिल 2015 (14:13 IST)

मोदींनी झापले; गिरिराज सिंग रडले

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी झापल्यामुळे केंद्रातील लघु व मध्यम उद्योगमंत्री गिरिराज सिंग हे रडल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे.

गिरिराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात वर्णभेदी वक्तव्य केले होेते. या प्रकाराबाबत त्यांना माफी मागावी लागली. त्यानंतर भाजप संसद सदस्यांच्या बैठकीनंतर मोदींनी त्यांना बोलावून घेतले व  त्यांनीही गिरिराज यांची कानउघाडणी केली. यावेळी गिरिराज यांना अखेर रडू कोसळले असे या वृत्तात म्हटले आहे.