शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनौ , शुक्रवार, 24 जुलै 2015 (11:51 IST)

लाच न दिल्याबद्दल जवानांनी खेळाडूला चालत्या ट्रेनमधून फेकले, मृत्यू

एका खळबळ उडवून देणार्‍या घटनाक्रमात बायकोसोबत ट्रेनमध्ये प्रवास करत असलेल्या राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूला जीआरपीच्या दोन जवानांनी उत्तरप्रदेशातील कासगंजजवळ धावत्या ट्रेनमधून फेकले. अपघातात त्याचा मृत्यू झाला.  
तलवारबाज होशियार सिंग आपल्या परिवारासोबत एका पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत होता. या दरम्यान त्याने आपल्या बायको व आईला महिला कोचामध्ये बसवले आणि स्वत: जनरल कोचामध्ये जाऊन बसला. काही वेळात बायकोची तब्येत खराब झाल्यामुळे त्याला महिला कोचामध्ये यावे लागले, तेथे उपस्थित जीआरपीच्या जवानांनी होशियार सिंगला तेथून जायला सांगितले.  

होशियार सिंग आपल्या बायकोची तब्येत खराब होण्याचे कारण सांगितले, पण जीआरपीच्या जवानांनी त्याला तेथे बसू दिले नाही.  

असे समजले आहे की जवानांनी त्याच्याकडून महिला कोचामध्ये बसण्याबद्दल 200 रुपए मागितले. विवाद वाढल्यानंतर जवानांनी खेळाडूसोबत मारहाण केला आणि त्याला धावत्या ट्रेनमधून धक्का दिला.  

घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जीआरपीचे दोन जवान आणि एक बुकिंग क्लर्क यांचा समावेश आहे. दोन्ही जवान फरार आहेत. होशियार मथुरेचा राहणारा होता. त्याने 2005 मध्ये केरळमध्ये आयोजित अंडर 17 राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले होते.