शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 ऑक्टोबर 2011 (11:23 IST)

सुरेश कलमाडींच्या कोठडीत वाढ

खासदार सुरेश कलमाडी यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 13 ऑक्‍टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्लीच्या न्यायालयाने आज हा निकाल दिला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात गैरव्यवहाराचे आरोप असणाऱ्या कलमाडी यांच्यासह नऊ जणांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या आरोपींच्या वकिलांना दि. 13 ऑक्‍टोबर रोजी युक्तिवाद सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.