शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

हजारेंच्या उपोषणाची परवानगी नाकारली!

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेला लोकपाल विधेयकाचा मसुदा न पटल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येथील जंतर मंतर वर 16 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार होते पण दिल्ली पोलिसांनी हजारे यांच्या उपोषणाला आज परवानगी नाकारली आहे. अण्णांनी दिल्लीच्या बाहेर उपोषण सुरू करावे. अथवा काही दिवसांसाठी उपोषण स्थगित करावे, असेही पत्रात पुढे म्हटले आहे.

ऑगस्टमध्ये संसदेत अधिवेशन असल्यामुळे, जंतर मंतर या मैदानावर जमावाला बंदी घालण्यात आली आहे. हजारे यांनी उपोषण केल्यास विविध संघटना येथे येतील, सुरक्षेच्या मुद्यावरून बंदी घालण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी हजारे यांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे.