बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. अलविदा मुशर्रफ
Written By भाषा|

मुशर्रफ यांना आश्रय नाही

पाकचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे खूप चांगले आणि वचनाचे पक्के आहेत, परंतु अमेरिकेला लोकशाहीही महत्त्वाची असल्याने मुशर्रफ यांना अमेरिकेत आश्रय देणे अशक्य असल्याचे मत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडालिजा राईस यांनी व्यक्त केल्याने आता मुशर्रफ यांच्यासाठी अमेरिकेचे दरवाजेही बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमेरिका आणि पाकिस्तानची विचार सरणी व्यापक आहे. दोनही देशांना दहशतवादाचा मुकाबला करायचा आहे. मुशर्रफ हे चांगले व्यक्ती आहेत, ते वचनाचे पक्के आहेत परंतु अमेरिकेसाठी लोकशाही तितकीच महत्त्वाची असल्याने मुशर्रफ यांना अमेरिकेचा आश्रय मिळणे अवघड असल्याचे त्या म्हणाल्या.