सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (18:39 IST)

पुणे: कात्रजचा खून झाला!

पुणे- पुण्यात विविध फ्लेक्स लागतात आणि त्याची वेगळी कहाणी दरवेळी समोर येत असते. असाच एक फ्लेक्स कात्रज चौकात लावण्यात आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कात्रजचा खून झाला ! असा मजकूर असलेला एक भला मोठा फ्लेक्स कात्रज चौकात लावण्यात आला आहे. त्यावर रक्ताचे डाग आणि एक चाकू दाखविण्यात आला आहे.
 
कात्रज चौकात मोकळ्या जागेत एक भला मोठा फ्लेक्स अज्ञातांनी लावला आहे. काळ्या आणि लाल रंगात त्यावर “कात्रजचा खून झाला” असे लिहीत चाकू आणि रक्त दाखवले आहे. आज पहाटे कात्रजकरांना हा फ्लेक्स दिसून आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हा फ्लेक्स कोणी लावला आणि त्याचा नेमका संबंध कोणाशी असा प्रश्न निर्माण झाला असून, उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
 
या फ्लेक्स पाठीमागचे नेमकं राजकारण समजू शकलेलं नाही. नुकतेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेलं उड्डाणपूल उद्घाटन आणि कात्रज कोंढवा रोडचा जागा संपादन विषय असे अनेक अर्थ आता नागरिक काढू लागले आहेत.