1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (13:17 IST)

पुणे : अंतरधार्मिक विवाह केला म्हणून नाराज भावाने बहिणीच्या पतीची केली हत्या

murder
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एका मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन  अंतरधार्मिक लग्न केले. यानंतर या मुलीच्या भावाने दोन जणांना सोबत घेऊन बहिणीच्या पतीची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी केस नोंदवून आरोपींना ताब्यात घेतले आहे. 
 
मिळलेल्या माहितीनुसार हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे आणि आरोपीच्या बहिणीचे प्रेमसंबंध होते व त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले. लग्नानंतर हे जोडपे पुण्यामध्ये येऊन राहावयास लागले. 
 
हा तरुण कंपनीमध्ये काम करीत होता. कामावरून घरी जातांना त्याला या आरोपीने बोलावले आणि जंगलात नेऊन दारू पिण्यास सांगितले. व नंतर दारूच्या नशेत या आरोपीने इतर दोन जणांना सोबत घेऊन तरुणाला मारहाण करण्यास सुरवात केली व नंतर दगडाने ठेचुन त्याची हत्या केली. नंतर त्याच्या अंगावर डिझेल टाकून त्याला जाळले. एवढेच नाही तर त्याची राख आणि हाडे नदीमध्ये विसर्जित केली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी आपल्या बहिणीने अंतरधार्मिक विवाह केला म्हणून नाराज होता. यामुळे डोक्यात राग घालून या आरोपीने हे कृत्य केले आहे.