1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (19:24 IST)

भरदिवसा गोळीबारात दोघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जगताप हा वाळू व्यावसायिक असून तो शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर उभा होता. त्याचवेळी पाच जणांनी संतोषवर तीक्ष्ण शस्त्रानं वार करत गोळीबार केला. यात संतोष जगतापचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याचे दोन्ही अंगरक्षक गंभीर जखमी झाले. संतोष जगताप याने केलेल्या गोळीबारात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला. इतर हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 
 
उरळीकांचन भागात गँगवार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटात झालेल्या गोळीबारात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलिस पोहोचले असून जखमींवर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दोन गटातील जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. मात्र, भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिक भरभीत झाले आहेत.