1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (15:36 IST)

घराचं स्वप्न पूर्ण होणार, गुढीपाडव्याला म्हाडाची मोठी सोडत

The dream
पुणे हौसिंग मंडळाच्या वतीने ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 2 हजार 890 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडा इतिहासात प्रथमच पाडव्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरांची सोडत काढणार आहे.
 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २ हजार घरांची म्हाडा सोडत काढत आहे. यात म्हाडाच्या योजनेतील 600 सदनिका आणि 20 % सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या 1300 असे एकूण 1900 सदनिकांच्या ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे.
 
या सोडतीचा प्रारंभ 13 एप्रिलला सकाळी 10 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. 13 एप्रिल दुपारी 12 वाजल्यापासून 13 मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी https:/ lottery.mhada.gov.in तसेच www.mhadamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्जाची नोंदणी करावी, असं आवाहन म्हाडाचे नितीन माने-पाटील यांनी केलं आहे.दरम्यान, कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याची माहिती नितीन माने पाटील यांनी सांगितलं आहे.