मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By अभिनय कुलकर्णी|

कॉंग्रेसने केले रेल्वे बजेटचे कौतुक

आगामी निवडणुका समोर ठेवून रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचे कॉंग्रेसने कौतुक केले आहे. सामान्यांवर कोणताही भार न लादता लालूंनी रेल्वेचा कायापालट केला अशा शब्दांत कॉंग्रेसने त्यांचे कौतुक केले.

कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक संघवी यांनी या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, की संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या ससरकारने सलग सहाव्या बजेटमध्ये भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. रेल्वे मंत्रालय व सरकार त्यासाठी कौतुकास पात्र आहे, अशी भलावणही त्यांनी केली.

सामान्यांवर कोणताही बोजा न लादता रेल्वेची रोकड सत्तर हजार कोटींपर्यंत पोहचविणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे, असे सांगून पूर्वी रेल्वे संपासाठी ओळखली जायची. पण गेल्या पाच वर्षांत लालूंनी त्याचा चेहरामोहरा बदलवला आणि त्याची जगभरात चर्चा होते आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.